BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुण्याला पुन्हा पावासाने झोडपले; नागरिक तासनतास अडकले वाहतूक कोंडीत

एमपीसी न्यूज – रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे वर आलेली खळी, बंद पडलेले सिग्नल, ‘पीएमपीएमएल’चा रांगेत असलेल्या बसेस, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस नसल्याने दुचाकी धारकांनी अक्षरशः फुटपाथवरून गाड्या पाठविल्या. तरीही या पुणेकरांना घरी पोहोचण्यासाठी 2 ते 3 तास लागले.

आज सायंकाळी सहा वाजता पावसाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. वाहतूक कोंडी मात्र रात्री 11 वाजले तरी सुरळीत काही झालीच नाही. शहरातील पेठांमध्ये तर दूरदूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. जंगली महाराज रोड, डेक्कन, फर्ग्युसन रोड, सिंहगड रोड, कोथरूड, कर्वेनगर, वारजे – माळवाडी, कात्रज, स्वारगेट, हडपसर, शिवाजीनगर, बाणेर – बालेवाडी, नगर रोड, येरवडा भागांत जाण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3