Pune : मेव्हण्याने कर्ज थकवल्याने घर जप्तीची नोटीस; एकाची गॅलरीतून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज : मेव्हण्याने बँकेचे कर्ज न फेडल्याने बँकेने घर जप्तीची (Pune) नोटीस पाठविली. तर, जामीनदार म्हणून राहिलेल्या पतसंस्थेचे देखील कर्ज न फेडल्याच्या नैराश्यातून एकाने घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खिशात मिळालेल्या सुसाईड नोटवरून हा प्रकार उघड झाला आहे.

विजय कृष्णराव हेरकळ (वय 49) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप ऊर्फ नितीन मधुकर मोरे व दिपा मोरे (रा. जोशी आळी, शिवाजीनगर गावठाण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हिना विजय हेरकळ (वय 45) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार शिवाजीनगर येथील साज चेंबर्स येथे 17 एप्रिल 2021 रोजी पहाटे घडला होता.

Sinhagad Crime : पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हेरकळ यांची बहिण दिपा मोरे हिने तिचे पती संदीप मोरे यांना पैशाची गरज असल्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांनी आपले राहते घर गहाण ठेवून साऊथ इंडियन बँकेतून 10 लाख रुपयांचे कर्ज काढले.

त्याचे हप्ते संदीप मोरे भरतील, या अटीवर त्यांनी 5 मार्च 2019 रोजी त्यांना साडेआठ लाख रुपये दिले. परंतु, मोरे याने हप्ते भरले नाहीत. जानेवारी 2020 मध्ये त्यावरुन त्यांच्या नातेवाईकांमध्ये बैठक झाली. संदीप मोरे याने ज्ञानदीप को ऑप सोसायटी पतसंस्था येथून कर्ज काढले होते. त्याला विजय हेरकळ जामीनदार राहिले होते. त्याचेही हप्ते न भरल्याने पतसंस्थेना त्यांना नोटीस पाठविली होती.

त्याबाबत हेरकळ यांनी वारंवार आपली बहिण व तिच्या पतीला हप्ते भरण्यास सांगितले (Pune) होते. परंतु, त्यांनी हप्ते भरले नाहीत. त्यामुळे एप्रिल 2021 मध्ये बँकेने गहाण ठेवलेले घर जप्त करण्याची नोटीस पाठविली. त्यामुळे ते सतत तणावात होते. त्यातूनच 17 एप्रिल 2021 रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.