Warje News : वारजेतील कुख्यात गुंड सौरभ पवार आणि त्याच्या टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी (Warje News) पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शहरातील वारजे परिसरात दहशत पसरवणाऱ्या सौरभ पवार व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 12 वी मोक्का कारवाई आहे. या टोळीत तिघांचा समावेश आहे.

सौरभ सुनिल पवार (वय 19), राहुल गणेश चव्हाण (वय 20) व कुमार हिरामण चव्हाण (वय 29, रा. सर्व कर्वेनगर) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सौरभ पवार टोळी प्रमुख असून, त्याने वारजे भागात वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन गंभीर गुन्हे केले आहेत.

जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, खंडणी मागणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर देखील गुन्हेगारी कृत्ये सुरूच होती.

Pune : मेव्हण्याने कर्ज थकवल्याने घर जप्तीची नोटीस; एकाची गॅलरीतून उडी मारून आत्महत्या

नुकतेच त्यांनी खिशातील पैसे काढून घेताना प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात बिअरची बॉटल घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्याचा तपास करताना सौरभ पवार (Warje News) व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव वारजे माळवाडी पोलिसांनी तयार केला होता.

त्यांनी पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे तसेच परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत सादर केला होता. त्यानूसार पोलीस आयुक्तांनी छाननी करून कारवाईचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.