Sinhagad Crime : पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पत्नी आणि तिचा प्रियकर सातत्याने त्रास देत (Sinhagad Crime) असल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ऑगस्ट 2022 मध्ये नर्हेत घडली आहे. याप्रकरणी कुटुंबियाने उशीरा तक्रार दिल्यानंतर तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरूद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र चंद्रकांत किंद्रे (वय 35 रा. जिजाई प्लाझा, कुटे मळा, नर्हे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत किंद्रे (वय 80 रा. नांदगाव भोर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Pune : पत्नीला वांझ म्हणून हिणवले, पतीसह सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल

रवींद्र आणि आरोपी महिलेचे 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिची एका तरूणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर तिने मित्रासोबत संबंध टिकविण्यासाठी रवींद्रसोबत सातत्याने वाद घातला.

त्याला मारहाण करून वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून रवींद्रने 17 ऑगस्टला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. पुढील तपास (Sinhagad Crime) पोलीस करत आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.