Pune : पुणे विभागात एकूण 8,122 कोरोनाबाधित तर 3,841 कोरोनामुक्त – डॉ. दीपक म्हैसेकर

In Pune division, a total of 8,122 corona-free and 3,841 corona-free - Dr. Deepak Mhaisekar

एमपीसी न्यूज- पुणे विभागातील  3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 पुणे जिल्हयातील 6 हजार 604  बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 355 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 295  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 394 कोरोना बाधीत रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 653 कोरोना बाधीत रुग्ण असून 297  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 292  आहे. कोरोना बाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील  कोरोना बाधीत 88 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 39  आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 383 कोरोना बाधीत  रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 360  आहे. कोरोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 77 हजार 117 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  72 हजार 747 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 64  हजार 516 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 122  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.