Pune : दिवसभरात 93 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; दोघांचा मृत्यू; 27 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : शहरात आज ( बुधवारी) दिवसभरात 93 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1432  वर पोहोचली आहे. तर आणखी दोन कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत एकूण 81 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले 27  रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, वडगाव शेरी येथील एका नगरसेविकेसह तिच्या मुलाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 673  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. करोनाचा संसर्ग झालेले 27  रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ७० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १४३२ इतकी झाली आहे. तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ११२१ वर पोहोचली आहे. शहरात आज ( बुधवारी) दिवसभरात ९३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.

तर आणखी दोन कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. यामध्ये एका रुग्णाचा ससूनमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

ससूनमध्ये आज केवळ एक पॉझिटिव्ह

ससून रुग्णांलयात आज 89 संशयित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर अन्य एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे ससूनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता 60  इतका झाला आहे.  आजपर्यंत या रुग्णालयात कोरोनमुक्त झालेल्या 13  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.