Pune : ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच ‘की बोर्ड’चे सूर; अनोख्या सादरीकरणाला रसिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या अनुभवसिद्ध सादरीकरणाने (Pune) सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झाली. पं पोहनकर यांच्यासह त्यांचे पुत्र आणि प्रसिद्ध की बोर्डवादक अभिजीत पोहनकर यांचा वादन सहभागही रंगत वाढविणारा ठरला. या अनोख्या गायन वादनाच्या निमित्ताने ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच की बोर्डचे सूर निनादले. पं.‌अजय पोहनकर यांनी ‘दरबारी’ रागात विलंबित एकतालात ख्यालाची मांडणी केली.

Pune : डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध

पहाडी रागात ‘सैया गये परदेस’ ही रचना पोहनकर पितापुत्रांनी एकत्रित पेश केली. कंठसंगीतासह की (Pune) बोर्ड असा वेगळा नादानुभव या निमित्ताने रसिकांनी अनुभवला. भैरवी मध्ये ‘नैना मोरे’ ही रचनाही त्यांनी सोबतीने सादर केली आणि ‘बाजूबंद खुल खुल जाए’ या रचनेने सांगता केली.

पोहनकर यांच्या सह सादरीकरणाला भरत कामत (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम), तसेच धनंजय जोशी आणि सुरंजन खंडाळकर यांनी तानपुरा व स्वरसाथ केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.