Pune : स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे 19 ते 23 डिसेंबर दरम्यान आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर (Pune) गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे करण्यात आले आहे.

विद्यापीठ परिसरातील संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये 19 ते 23 डिसेंबर 2023 दरम्यान देशभरातील 27 संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. ‘एज्युमेटीका’चे संस्थापक संजीव कुमार व ‘इन्फोसिस पुणे’चे वरिष्ठ उपाध्यक्ष, मृत्यूंजय सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार आहे.

Pune : ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच ‘की बोर्ड’चे सूर; अनोख्या सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी (Pune) व त्यांच्या नवकल्पना सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. एमआयटी एडीटी विद्यापीठ हे या स्पर्धेसाठीचे नोडल केंद्र असून या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील 27 संघांचे विद्यार्थी हजेरी लावणार आहेत. हे संघ कृषी, फूडटेक आणि ग्रामीण विकास, मेडटेक / बायोटेक / हेल्थटेक, हेरिटेज आणि कल्चर, फिटनेस आणि स्पोर्ट्स आणि स्मार्ट ऑटोमेशन या डोमेनमधून निवडलेल्या आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करतील.

2017 मध्ये सुरू झाल्यापासून स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची व्याप्ती प्रत्येक वर्षासह विस्तृत होत आहे. दरवर्षी राज्यपातळीवर ‘एसआयएच’मध्ये लाखो विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करतात. या राष्ट्रीय स्तरावरील ‘एआयएच’ महाअंतिम फेरीत 12 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ त्यांच्या मार्गदर्शकांसह देशभरात सरकारतर्फे निवडल्या गेलेल्या नोडल केंद्रांमध्ये आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. 19 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.