Khadakwasla dam Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 9416 क्यूसेक विसर्ग सुरु 

एमपीसी न्यूज : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 9416 क्यूसेक विसर्ग सुरु आहे.(Khadakwasla dam Update) अशी माहिती यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1, खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी दिली.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 11,076 क्युसेक विसर्ग कमी करून आज सकाळी 8.00 वा. 9416 क्यूसेक करण्यात आला आहे.  यामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. असे सांगण्यात आले आहे.

Laksha dance event :  लक्ष्य ‘ या नृत्य कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग (Khadakwasla dam Update) पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची नोंद घेण्यात यावी. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1, खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.