Pune : सिंहगड रोड परिसरात कोयता गॅंगची दहशत; एकावर प्राणघात हल्ला

एमपीसी न्यूज- पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील (Pune) नर्हे या ठिकाणी पाच ते सात जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. पूर्ववैमनस्यतून हा संपूर्ण प्रकार घडलाय. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पाच ते सात जणांविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण जांभळे, गणेश खांडेकर, मन्या सुर्वे, मयूर परब, अक्षय बारगजे आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दिलीप लोखंडे (वय 32) या तरुणाने तक्रार दिली आहे.

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराचा तो निर्णय अखेर मागे

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या एका मित्राच्या मांडवटाळा कार्यक्रमात आरोपी मोठ्या सुर्वे आणि फिर्यादीच्या मित्राचे भांडण झाले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी हे काही मित्रांसह जेवण करण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपींनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. थांब तुला मारून टाकतो असे मोठमोठ्याने ओरडून फिर्यादी यांच्यावर कोयताने हल्ला केला.
यामध्ये फिर्यादींच्या डोक्यात आणि हाताच्या मनगटावर कोयत्याचे वार बसल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी फिर्यादी जेवण करीत असलेल्या ठिकाणी दगडफेक करत खुर्च्यांची तोडफोड (Pune) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.