Pune : भारतीय विद्या भवनामध्ये रंगणार ‘लावणी ठसका’ कार्यक्रम; सर्वांना विनामूल्य प्रवेश!

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Pune) वतीने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘लावणी ठसका ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि.23 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ‘भारतीय विद्या भवनाचे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.

हार्मनी इन्स्टिट्यूटचे संचालक उपेंद्र लक्ष्मेश्वर यांच्याद्वारे हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात येणार आहे.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 182 वा कार्यक्रम आहे. लावणी ठसका कार्यक्रमात गिटार, माउथ ऑर्गन, की -बोर्डवर मराठी लावण्या, सुप्रसिद्ध हिंदी गाणी सादर केली जाणार आहेत.

या कार्यक्रमात अविनाश कुलकर्णी, राजू जावळकर, संदीप शिंगाडे, (Pune) कैवल्य खिस्ती, दीपाली उपाध्ये, डॉ.सरिता साखळकर, प्रीती करमरकर, सौरभ दामले, सोनाली आगटे, मिलिंद आगटे, राजवीर ससाणे हे कलाकार सहभागी होणार आहेत.

Podcast : इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफ एम आणि चंदनगाभा प्रस्तुत ‘सुखकर्ता तू’ गणेशोत्सव मालिका

या कार्यक्रमासाठी संयोजन कुमार शेल्डेकर यांचे संगीत तर शशांक दिवेकर यांचे निवेदन असणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.