Pune Metro : आज पासून मेट्रोचे रिटर्न तिकीट मिळणार नाही

एमपीसी न्यूज – महामेट्रोने (Pune Metro) तिकिटांसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता 1 मार्च पासून मेट्रो प्रवाशांना मेट्रोचे रिटर्न तिकीट (Metro Return Ticket) मिळणार नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या दोन्ही वेळी स्वतंत्र तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रवाशांना तिकिटासाठी मेट्रोकडून काउंटर तिकीट, व्हाटसअप तिकीट, एटीव्हीएम तिकीट, मेट्रो  ॲप असे विविध पर्याय दिले आहेत. तसेच यामध्ये प्रवाशांना रिटर्न तिकीट देखील काढता येत होते. मात्र मेट्रोकडून हा रिटर्न तिकिटाचा पर्याय 1 मार्च पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC Metro Station) ते जिल्हा न्यायालय (Civil Court Metro Station) आणि वनाज (Vanaz Metro Station) ते रुबी हॉल (Ruby Hall Clinic Metro Station) या दोन मार्गांवर 24 किलोमीटर अंतरावर मेट्रो सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आणखी नऊ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्यातील काही भाग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना जोडणाऱ्या प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये मेट्रो चांगला पर्याय म्हणून समोर आली आहे. वाहतूक कोंडीतून सुटका करत हजारो नागरिक दोन्ही शहरादरम्यान प्रवास करीत आहेत. त्यात आता मेट्रोने परतीच्या प्रवासाचे तिकीट बंद केल्याने जाता-येता प्रवाशांना तिकीट काढावे लागणार ( Pune Metro) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.