Pune: मुंबई रिपब्लिक संघाचा सनसनाटी विजय; गतविजेत्या एक्‍सलन्सी अकादमीला हरवून उपांत्य फेरीत

हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी; हॉकी पुणे, क्रीडा प्रबोधिनी, रोव्हर्सचेही आव्हान संपुष्टात

एमपीसी न्यूज – मुंबई रिपब्लिक संगाने गतविजेत्या एक्‍सलन्सी हॉकी संघाचे एकमात्र गोलच्या जोरावर आव्हान संपुष्टात आणत आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश केला.

नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी मैदानावर आज झालेल्या सामन्यात हॉकी पुणे, रोव्हर्स अकादमी अ आणि क्रीडा प्रबोधिनी संघांचे आव्हान देखील संपुष्टात आले. मुंबई कस्टम, इन्कमटॅक्‍स, पुमे आणि स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात संघांनी उपांत्य फेरी गाठली.

  • दिवसातील अखेरच्या सामन्यात मुंबई रिपब्लिकन्स संघाला प्रतिस्पधी एक्‍सलन्सी संघाचे कडवे आव्हान सहन करावे लागले. सामन्यातील एकमेव गोल सामन्याच्या 24व्या मिनिटाला तेजस चव्हाण याने केला. यानंतर मुंबई रिपब्लिकन संगान आपले गोलाधिक्‍य वाढविण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला. मात्र, त्यांना एक्‍सलन्सी अकादमीचा बचाव भेदण्यात अपयश आले. गोल करण्याच्या त्यांनी संधी निर्माण केल्या खऱ्या पण, त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. अनुज सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करण्याची संधी दवडल्यामुळे त्यांना दुसरा गोल करता आला नाही.

मुंबई संघाच्या आक्रमकांपेक्षा त्यांचा गोलरक्षक कुणाल ढोले याची कामगिरी लक्षात राहिली. मुंबईच्या विजयात त्याचीच कामगिरी विलक्षण ठरली. त्याने एक्‍सलन्सी संघाचा एक पेनल्टी स्ट्रोक शिताफीने व्यर्थ दवडला.

  • एका चुरशीच्या सामन्यात मुंबई कस्टम्स संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाचे आव्हान 3-2 असे परतवून लावले. इफ्तेदार शेख याने दोन, तर जोशुहा वेसावकर याने एक गोल केला. क्रीडा प्रबोधिनीकडून अनिकेत गुरव आणि रोहन पाटिल यांनी गोल केले.

आणखी एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इन्कमटॅक्‍स संघाने नितीन कुमारच्या चमकदार खेळाच्या जोरावर हॉकी पुणे संघाचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणले. स्पर्धेत सातत्याने गोल करणाऱ्या हॉकी पुणे संघाच्या आक्रमकांचे आज काही चालले नाही. इन्कॅमटॅक्‍ससाठी नितीन कुमारने खाते उघडले.

  • यावेळी त्याने मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तालिब शेख आणि रिषभ शहा यांनी गोल करून हॉकी पुणे संघाला आघाडीवर नेले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अजितेश रॉय याने इन्कॅमटॅक्‍सला बरोबरी साधून दिली. शेवटी नितीन कुमारने वैयक्तिक दुसरा गोल करून इन्कमटॅक्‍स संघाचा विजय निश्‍चित केला.

यजमान रोव्हर्स अकादमी अ संघाला स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात संघाकडून पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या चौथ्याच मिनिाला अशाब कुरेशी याने गुजरात संगाला आघाडीवर नेले. त्यानंतर माक्ष अंकित गौडच्या दोन गोलमुळे त्यांना 1-2 अशा पिछाडीवर रहावे लागले. मध्यंतराला सामना 1-1 असा बरोबरीत होता. उत्तरार्धात सुरवातीलाच अंकितने गोल केला. मात्र, त्यानंतर गुजरात संघाने वेगवान खेळ करून सामन्यावर नियंत्रण ठेवले. रुचित पटेलने हॅटट्रिक साधत संघाचा विजय साकार केला. यातील दोन गोल त्याने पेनल्टी स्ट्रोकवर केले.

  • निकाल :
    स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात 4 (अशाब कुरेशी 4, रुचित पटले 44, 51, 58वे मिनिट) वि.वि. रोव्हर्स अकादमी अ 2 (अंकित गौड 13, 40वे मिनिट) मध्यंतर 1-1.
    इन्कमटॅक्‍स, पुणे 3 (नितिन कुमार 26, 54, अजितेश रॉय 52वे मिनिट) वि.वि. हॉकी पुणे 2 (तालिब शाह 39, रिषभ शहा 51वे मिनिट) मध्यंतर 1-0 .
    मुंबई कस्टम्स 3 (जोशुआ वेसावकर 7, इफ्तेदार शेख 24, 52वे मिनिट) वि.वि. क्रीडा प्रबोधिनी 2 (अनिकेत गुरव 28, रोहल पाटिल 59वे मिनिट) मध्यंतर – 1-1 .
    मुंबई रिपब्लिकन्स 1 (तेजस चव्हाण 24वे मिनिट) वि.वि. एक्‍सलन्सी अकादमी 0 मध्यंतर 1-0.

उपांत्य फेरीचे सामने :
स्पोर्टस ऍथऑरिटी ऑफ गुजरात विरुद्ध इन्कमटॅक्‍स -दु. 2 वा.
मुंबई कस्टम्स विरुद्ध मुंबई रिपब्लिकन -दु. 3.30 वा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.