Pune: महापालिका प्रशासनाने भाजपच्या दबावाला बळी पडू नये- शिवसेना

Pune Municipal administration should not fall prey to BJP pressure says shiv sena केंद्र सरकारने दिलेला निधी राज्य शासन पुणे महापालिकेला देत नाही, असा जावईशोध खासदार गिरीश बापट यांनी लावला. ते पुणेकरांची दिशाभूल करीत आहेत

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक असलेली केवळ 33 टक्केच कामे करण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत. महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने काम करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, सह संपर्कप्रमुख शाम देशपांडे, प्रशांत बधे उपस्थित होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन अंदाजपत्रकातील सर्व कामांचे टेंडर व कार्यादेश देण्याची मागणी केली होती. त्याला शिवसेनेने आता विरोध केला आहे.

केंद्र सरकारने दिलेला निधी राज्य शासन पुणे महापालिकेला देत नाही, असा जावईशोध खासदार गिरीश बापट यांनी लावला. ते पुणेकरांची दिशाभूल करीत आहेत, असा हल्लाबोल शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.

गिरीश बापट स्वतः राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री होते. अत्यावश्यक असलेली ३३ टक्के कामेच करण्यात यावीत, असे राज्य शासनाचे आदेश आहेत. पुणे महापालिकेलाही हा आदेश लागू आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना सत्ताधारी विकासकामांच्या निविदा लावून आयुक्तांवर दबाव आणत आहेत, अशी टीकाही शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

यापूर्वीच भाजपने करांचे ओझे पुणेकरांवर लादले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या पुणेकरांवर भविष्यात कोणतीही करवाढ होणार नाही, ते प्रशासनाने बघावे, असेही शिवसेनेतर्फे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.