Pune News : पुणे महापालिकेने केला लसीकरणाचा नवा विक्रम, एका दिवशी सुमारे 51 हजार जणांना लस

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेने लसीकरणाचा नवा विक्रम केला आहे. तीन दिवसांत एक लाख जणांचा लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. सरकारकडून मुबलक लस उपलब्ध झाल्यानंतर आता पुणे महापालिकेने लसीकरणाच्या प्रक्रियेत जोरदार वेग घेतलाय. रोज खाजगी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांची मिळून 60 हजार जणांचं रोज लसीकरण करण्याची क्षमता नियोजित आहे.

26 जूनला आतापर्यंतच सर्वाधिक लसीकरण करत एका दिवशी सुमारे 51 हजार जणांना लस देण्यात आली आहे. .तर 26 तारखेपासून तीन दिवसात एक लाख दोन हजार 603 जणांना लसीकरण करण्यात आलं आहे.

लसींचा पुरवठा जर रोज मुबलक प्रमाणात झालं तर 20 दिवसातच संपूर्ण शहरातील एकूण लोकसंख्या लसीकरण करून पूर्ण होऊ शकेल. आतापर्यंत शहरात 13 लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून आणखी सुमारे 25 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं बाकी आहे असा अंदाज महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांचा आहे.

आता पर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी पाहिल्यानंतर शहराच्या लसीकरणाबाबत चित्र स्पष्ट समोर येत आहे. पहिला डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 1312549 इतकी आहे, तर दुसरा डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 360970 इतकी आहे.

पुणे महापालिकेला शहराच्या एकूण लसीकरण करायच्या नागरिकांची मतदार यादीनुसार लोकसंख्या 2634800 इतकी आहे तर शहरात येणाऱ्या जाणाऱ्या किंवा बाहेरून लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या पाहता महापालिका अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार एकूण लसीकरण कराव्या लागणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे 35 लाख इतकी असू शकेल अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी वैशाली जाधव यांनी दिली.

जर मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाली आणि याच वेगाने पुणे महापालिकेने लसीकरण केलं तर सर्व नागरिकांना लस देण्यासाठी साधारण 30 ते 40 दिवस लागू शकतील. त्यामुळे महापालिकेच्या कार्यक्षमतेचा शहरातल्या वर्तुळात कौतुक होत आहे. याच वेगाने नोंदणी करून लसीकरण होणार असेल तर रांगा लावण्यापेक्षा ही प्रक्रिया जास्त उत्तम ठरतेय. त्यामुळे नियोजित वेळत लसीकरण होण्यास मदत होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.