Pune : सिंहगड रस्ता भागात वेटरचा खून

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्ता भागात वडगाव परिसरात (Pune)एका हॉटेल मधील वेटरचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. वेटरचा खून वादातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सुनीलकुमार राम आसरे (वय 25, रा. चमका बनी, हरदोई, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. याबाबत सुशीलकुमार (वय 25, रा. गंगाई हाईट्स, आंबेगाव बुद्रुक) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलकुमार आणि सुशीलकुमार नातेवाईक आहेत.

PMC : पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाचे मोठे षडयंत्र; माजी नगरसेवकांचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे जण आंबेगाव बुद्रुक (Pune)परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. वडगाव बुद्रुक परिसरात दांगट शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत सुनीलकुमार मृतावस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुनील कुमारच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सुनील कुमारच्या खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत वादातून त्याचा खून झाल्याची माहिती मिळाली असून, पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.