Pune : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहिया नगर (Pune Crime) परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा असल्याने हा खून केला असल्याची शक्यता आहे.

मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मयत व्यक्ती ही अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे इतके आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोहियानगर परिसरातील महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयासमोर पालिकेचे जुने गाळे आहेत. या गाळ्यांच्या आवारात सध्या कचरा टाकला जातो.

याच आवारात एका मोकळ्या सोफ्यावर तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर खडक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून (Pune Crime) रुग्णालयात पाठवला आहे. मयत व्यक्तीच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा आढळून आले आहेत.

मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune : मुक्तसंगीत चर्चासत्रात उलगडली ‌‘कुमार गंधर्व गायकी व परंपरा’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.