Pune : शरद पवार मोदींसोबत; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मात्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे शहरात (Pune) आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी पुण्यात असणार आहेत. मात्र नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याला महाविकास आघाडीसह डाव्या विचारसरणीच्या व आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील टिळक पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता आंदोलन करून निषेध केला जाणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस सह काँग्रेस आणि शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याबाबत राष्ट्रवादीची (Pune) नेमकी भूमिका काय याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

मणिपूर हिंसाचार थांबला नसता नाही पंतप्रधान पुण्यात पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. याचाच निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निषेध म्हणून काळे कपडे परिधान करणार आहोत आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ भजने गाऊन त्यांना समृद्धी देण्याची मागणी करणार आहोत असे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Pune : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाचा खून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.