Pune New : कचरा वाहतुकही आता ‘ई-वाहना’तून होणार?

एमपीसी न्यूज – वाढते प्रदुषण रोखण्यासाठी ई – वाहनांचा प्रयत्नपुर्वक वापर करण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर चालणार्‍या मोठ्या वाहनांतुन कचरा वाहतूक करता येईल का ? याची चाचपणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात यापुर्वीच ई – बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे प्रदुषण कमी करण्यास हातभार लागला असताना इंधनावरील खर्चातही कपात झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी 50 ई – बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. अशातच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 2021-22 या वर्षिच्या अंदाजपत्रकामध्ये अधिकार्‍यांसाठी ई- मोटारी खरेदीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत या मोटारी खरेदी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

यासोबतच महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी मोठे ट्रक आहेत. या विभागासाठी ई – ट्रक वापरता येतील? याची चाचपणी सुरु आहे. या ट्रकची कचरा वहन क्षमता, वजन क्षमता तपासण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर चार ट्रकचा वापर करण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेने खाजगी संस्थेसोबत ई- बाईक्स भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला यापुर्वीच मान्यता दिली असून महापालिका शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारुन देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.