Pune News: पुण्यातील रस्त्यावर धावण्यासाठी 100 ‘कोरोना मुक्त’ रिक्षांचा ताफा सज्ज

Pune News: 100 'Corona free' rickshaws ready to run on the road प्रवासी चढताना व उतरताना रिक्षा निर्जंतुक करण्यासाठी रिक्षा चालकाकडे निर्जंतुकीकरण द्रव्याचा पंप असेल.

एमपीसी न्यूज- यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी पुण्यात रिक्षा पंचायतीच्या वतीने ‘कोरोना मुक्त रिक्षा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातील रिक्षांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

टाळेबंदी शिथिल झाल्यावर 1 ऑगस्ट 2020 पासून सर्वांना प्रवासी सेवा देण्यासाठी ऑटो रिक्षा खुल्या झाल्या. आहेत. तरीही एकूण रिक्षांपैकी 25-30 टक्केच रिक्षा सध्या रस्त्यावर दिसतात. पण सकाळी 7-8 वाजता प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर आलेल्या रिक्षा चालकांना दुपारनंतरही भाडे मिळत नाही. परिणामी दिवसात 100 ते 150 रुपहेही कमाई होत नाही. याचे कारण लोकांमध्ये असलेली भिती.

ही भिती घालवण्यासाठी आणि प्रवास करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या वतीने ‘कोरोना मुक्त रिक्षा’ हा उपक्रम सुरू केला आहे. सुरवातीला अशा 100 कोरोना मुक्त रिक्षांचा ताफा रिक्षा पंचायत रस्त्यावर आणत आहे.

– कोरोना मुक्त रिक्षामध्ये चालक व प्रवासी यांच्यामध्ये पारदर्शक पडदा असेल

– प्रवासी चढताना व उतरताना रिक्षा निर्जंतुक करण्यासाठी रिक्षा चालकाकडे निर्जंतुकीकरण द्रव्याचा पंप असेल.

– रिक्षाचालकाकडे वैयक्तिक वापरासाठी सॅनिटायझर बाटली असेल.

– रिक्षा चालकाने मुखपट्टी (फेसमास्क) व फेसशील्ड लावले असेल.

– या रिक्षा वेगळ्या ओळखण्यासाठी रिक्षावर दर्शनी भागात ‘कोरोना मुक्त रिक्षा’ या मथळ्याचे स्टिकर लावलेले असेल.

या रिक्षांच्या ताफ्याला आज (शुक्रवार) सायंकाळी चार वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात सौरभ राव यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर होणारा हा उपक्रम औचित्यपूर्ण व दिशादर्शक ठरेल. यामुळे मिशन बिगिन अगेनलाही बळ मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.