Pune News: तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज: पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनचा हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  एका अठरा वर्षीय तरुणाने १३ वर्षीय मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

पाच दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे. एकाच परिसरात राहण्यास असल्याने आरोपी पिडीत मुलीला ओळखत होता. त्याने मुलीला बोलवत तिच्यावर अत्याचार केला. मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.