Pune News: ‘पानशेत’मधून 2407 तर ‘खडकवासला’तून 9383 क्युसेक वेगाने विसर्ग- महापौर

Pune News: 2407 cusecs from 'Panshet' and 9383 cusecs from 'Khadakwasala' Water released- Mayor Murlidhar mohol धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

एमपीसी न्यूज – पानशेत धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने 2 हजार 407 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. हे पाणी खडकवासला धरणात आल्यावर खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 9 हजार 383 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिली.

धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणही 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

आता पुणेकरांना दोन वेळा चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 1.90 टीएमसी (96.17 टक्के), पानशेत 10.65 टीएमसी (100 टक्के), वरसगाव 11.06 टीएमसी (86.31 टक्के), टेमघर 2.58 टीएमसी (69.72 टक्के) असा चारही धरणांत एकूण 26.19 टीएमसी म्हणजेच 89.87 टक्के पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. ही आकडेवारी आज (दि.18) सकाळी 6 पर्यंतची आहे. दरम्यान, पुणे महापालिका महिन्याला दीड टीएमसी पाणी उचलते. या हिशोबाने पुणेकरांना वर्षाला साधारण 18 टीएमसी पाणी लागते. आता या चारही धरणांत तब्बल 26.19 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.