Nigdi News : दाखल्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या डाटा ऑपरेटरला अटक

एमपीसी न्यूज – जातीच्या दाखल्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या  निगडी येथील अपर तहसील कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटरला लाचलुचपत (Nigdi News) विभागाने अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.2) निगडीतील नागरी सुविधा केंद्रात केली आहे.

शैलेश अकांबरी बासुतकर (वय 41 ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Dehuroad News : भंडारा डोंगरावरील हरिनाम सप्ताहाची सांगता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या दोन लहान बहिणीसाठी जातीचा दाखला हवा होती. त्यासाठी त्यांनी नागरी सुविधा केंद्रात अर्ज केला असता नागरी सुविधा केंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटर शैलेश याने चार हजार रुपयांची लाच मागितली.

याप्रकऱणी लाचलुचपत विभागाकडे फिर्यादी यांनी तक्रार केली अशता पथकाने 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या काळात प्रकणाची पडताळणी  केली व गुरुवारी निगडी सुविधा केंद्र येथे सापळा रचून आरोपीला अटक केले. याचा पुढील तपास लाचलुचपत विभाग पुणे चे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.