Pune News : ॲडवोकेट कासलीवाल समान नागरी कायद्यासाठी पुणे ते दिल्ली करणार पायी प्रवास

एमपीसी न्यूज – समान नागरी कायदा सर्व भारतभर असावा (Pune News) आणि समानता नाकारणारे व विभागणी करणारे सर्वच व्यक्तिगत कायदे हे काढून टाकावे असे ॲडवोकेट नितीन कासलीवाल यांचे म्हणणे आहे. हे होण्यासाठी ते दिनांक 14 एप्रिल 2023 पासून ते पुणे ते दिल्ली पायी चालत जाणार आहेत.

ॲडवोकेट नितीन कासलीवाल यांनी एप्रिल २०२२ पासुन पंतप्रधान व अन्य संबंधित यांना नोटीस पाठवुन, समान नागरी कायदा चा मानवता आधारित दिशादर्शक मसुदा पाठवुन एक वर्ष पाठपुरावा ही केला. परंतू तरी सुद्धा मानवते विरुद्ध काही कलम भारतीय जनतेवर थोपले जात आहेत असेही एडवोकेट कासलीवाल म्हणतात.

Pune : भटक्या कुत्र्यांपासून बचाव करत असताना सायकलवरून पडून 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

भारतीय घटनेचे preamble व कलम 14, 15 च्या विरुद्ध असणारे व कलम 13 प्रमाणे गैर लागू आहेत, असे म्हणणे ॲडवोकेट कासलीवाल यांचे आहे.

गेली 70 वर्ष पेक्षा ही जास्त कालावधी कलम 44 ला अपेक्षीत मानवता आधारीत समान नागरी कायदा आणण्यासाठी संसद व सर्व संबंधित चालढकल करीत असल्याने ॲडवोकेट नितीन कासलीवाल यांनी पुणे दिल्ली पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कासलीवाल यांचे असे म्हणणे आहे,बकी घटनेच्या कलम 25 मध्ये सांगितलेली व अभिप्रेत असलेले सद्सदविवेकबुध्दीचे स्वातंत्र्य आणि (संस्कार) धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कलम 14 व 15 यांचे अधीन राहून, भेदभाव न करता असलेले स्वातंत्र्य व मुक्तता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.