Pune : भटक्या कुत्र्यांपासून बचाव करत असताना सायकलवरून पडून 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भटक्या कुत्र्यांची लहान मुलांना काय तर (Pune) मोठ्या नागरिकांना देखील भिती वाटते. त्यात विशेषत: तुम्ही गाडीवरून जात असाल तर कुत्रे तुमच्या मागे लागलेच म्हणून समजा….अशीच एक घटना गुरुवारी (दि.16) सकाळी धायरी येथे घडली. ज्यात मुलगा सायकलवरून पडून सायकलचा ब्रेक त्याच्या पोटात घुसून तो गंभीर जखमी झाला आहे.

अर्जून सुपेकर असे जखमी मुलाचे नाव असून अर्जून गल्लीत सायकलवर खेळत असताना कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात सायकलवरून पडल्यानंतर ब्रेक पोटात घुसून तो गंभीर जखमी झाला आहे. यात त्याचा एक हात देखील फ्रॅक्चर झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Moshi News: मोशी-आदर्शनगरमध्ये वीजवाहिन्या होणार भूमिगत

भटक्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्यांनी नागरिकांच्या जिवाची ही काळजी घ्यावी. तसेच, अशा (Pune) घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी भावना जखमी मुलाच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.