Pune News : सदानंद शेट्टी यांच्यावरील विश्वास आणखी वाढला : अजित पवार

एमपीसी न्यूज – टुमदार घरे देण्याचे स्वप्न आज पुरे झाले. गोरगरीब नागरिकांना हक्काचे घरे देण्याचे स्वप्न सदानंद शेट्टी यांनी पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास आणखी वाढला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सदा आनंदनगरमध्ये 130 घरांचे चावी वाटप व करारनामा व कै. मातोश्री श्रीमती पद्मावती (आम्मा) कृष्णा शेट्टी व्यापार व निवासी संकुलाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार ऍड. वंदना चव्हाण, पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, नगरसेविका सुजाता शेट्टी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, गोरगरीब नागरिकांना आज घरे मिळाली. शेट्टी यांचा वाढदिवस असल्याचे माहित नव्हते. बोट दाखविणारा प्रकल्प उभारल्याने सदानंद शेट्टी यांच्यावरील विश्वास वाढला आहे. झोपडपट्टी धारकांना पक्की घरे मिळाली पाहिजे. या प्रकल्पामुळे इतर व्यवसायचे दर वाढले. शेट्टी यांच्या घरातील व्यक्तीलाच लोक निवडून देतात. शेवटच्या टप्प्यात चावी देण्याचे स्वप्न पाहण्यासाठी आई हवी होती.  मात्र, ते झाले नाही. त्याबद्दल मी श्रद्धांजली वाहतो. या घरात गेल्यावर चांगले जीवन जगा. या प्रकल्पात घरे मिळाल्यावर विक्री करू नका. नंतर झोपडपट्टीत राहायला जातात. तसे व्हायला नको. सन्मानाने जगा, पुणे शहरातील झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पुढे यावे. तसेच मंगळवार पेठेत 17 झोपडपट्ट्या आहेत.  राजेंद्र निंबाळकर यांना 2 झोपडपट्टी फाईल दिल्या आहेत.

पुणेकरांसाठी लवकर मेट्रो सुरू होईल. कोरोनाचे संकट जगावर आले आहे. त्यावेळी आरोग्य सोयीसुविधा किती महत्वाचे आहे ते कळले. आता महत्वाचे सण आहेत. त्यासाठी काळजी घ्यावी.

सदानंद शेट्टी म्हणाले, झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. ही कमिटमेंट आज पूर्ण होत आहे. लॉटरी न काढता 130 घर वाटप, चावी वाटप आज करण्यात आले. आईला मी पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. ते वाचन आज मी पाळले. देशात 1 नंबर सदानंद नगर झाले. 40 ते 45 वर्षे माझ्यामागे असल्याने मी चांगले काम करू शकलो. तसेच पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता अणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदारसंघातून राष्ट्रवादीला मोठा जनाधार मिळेल. सदानंद शेट्टीवर झोपडपट्टी मुक्त काम केल्याने विश्वास होता. राजेंद्र निंबाळकर एसआरएमध्ये चांगले काम करीत आहेत. टीडीआर बाबतीत धोरण ठरवून द्यावे.

राजेंद्र निंबाळकर म्हणाले, जास्तीत जास्त घरे पक्की द्यायची आहेत. त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. त्रूटी दूर व्हाव्यात. अजित पवार यांच्याकडे पटकन निर्णय होतात.

सुजाता शेट्टी म्हणाल्या, स्वप्नपूर्ती सोहळ्यात अजित पवार उपस्थित आहेत. नाना पटोले यांनी फोन करून इतर ठिकाणी जावे लागत असल्याचे सांगितले. सामान्य माणसाच्या चेह-यावर हास्य नेहमी फुलले पाहिजे. रातोरात कष्ट बघितले आहे. अभिनास्पद अशी ही वस्तू आहे. सिद्धांत आणि साक्षांत शेट्टी यांचाही मोठा वाटा आहे.

सुधीर गाळगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.