Pune News: कोरोना योद्धांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

Pune News: Corona Warriors felicitated by Mayor murlidhar mohol शनिवारी सकाळी महापालिका भवन प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

एमपीसी न्यूज – 74 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मनपा प्रांगणातील हिरवळीवर ध्वजारोहण पार पडले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘कोविड-19’ महामारीच्या काळात अहोरात्र काम करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार यांचा प्रातिनिधिक स्वरूपातील ‘कोविड योध्दा’ म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शनिवारी सकाळी महापालिका भवन प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोरोना आजारावर मात केलेल्या बिगारी सचिन सकट, विशाल वाल्मिकी, चंद्रकांत भडकवाड, दत्तात्रय रास्ते, साधना पाटोळे, आरोग्य विभागातील डॉ. दत्ता शेटे, डॉ. दिनेश बेंडे, डॉ. राजेश दिघे, डॉ. अनिल तोडसाम, डॉ. माधुरी रोकडे, नर्सेस सुनीता घोडे, प्रतिमा बारसे, श्रद्धा गायकवाड, तनुजा रावळ, शीतल मुंढे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.