Pune Crime News : गावठी कट्टा बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात 

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पश्र्चिम गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 20,100 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

मुनाफ रियाज पठाण ( वय. 23, रा. डोके तालिम समोर, नानापेठ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पठाण हा नाना पेठेतील मांगीरबाबा मंदीराच्या मागे कमरेला पिस्तूल लावून थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी बातमीची सहशिना करुन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सापडली. आरोपीनी विनापरवाना पिस्तूल बाळगत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 20,100 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी ही गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र माहिते, पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस कर्मचारी उदय काळभोर, साहील शेख, प्रमोद टिळेकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.