Pune Crime builder Avinash BhosaleNews : ईडीची पुन्हा कारवाई, बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची चार कोटीची संपत्ती जप्त

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची तब्बल 4 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा जप्त केली आहे. ईडीने दुस-यांदा अविनाश भोसले यांच्या संपत्तीवर कारवाई केली आहे.

अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित ईडीच्या रडारवर आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणी दोघांना ईडीने यापूर्वी समन्स पाठवला होता. पुण्यातील सरकारी जागेवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉन नंबर 2, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत स्थित आहे.

यापूर्वी परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती. भोसले कुटुंबीयांची पुणे, नागपूर, गोवा परिसरात तारांकित हॉटेल्स आहेत. तसेच दुबईतील एका कंपनीत भोसले यांची गुंतवणुकही आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’ (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट 1999) कायद्यान्वये सप्टेंबर 2017 पासून चौकशी सुरू होती.

भोसले यांची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (अबिल) ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने भोसले तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात एक कोटी 15 लाख रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे.

परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (21 जून) भोसले तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेली 40 कोटी 43 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.