Pune News : कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री 

एमपीसी न्यूज– मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन उद्योग विक्री केंद्र ( Pune News) येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अप्पर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे गुप्ता यावेळी म्हणाले.

यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, मुख्यालयाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप आदी उपस्थित होते.

कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात, असे सांगून श्री. गुप्ता म्हणाले, बंदीजनांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध (Pune News) करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात. कायद्यानुसार बंद्यांना पुरविण्यास आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा कारागृह विभागाच्यावतीने उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

Pimpri News : लाल बहादूर शास्त्री यांची शेतकऱ्यांबद्दलची आत्मियता प्रेरणा देत राहील – अतिरिक्त आयुक्त जगताप

गुप्ता पुढे म्हणाले, शासनाच्या विविध विभागाकडून कारागृह उत्पादीत टेबल, खुर्ची, कपाटे, गणवेश, सतरंजी, साड्या, फाईल्स आदी वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतू बंदीजनांनी तयार केलेल्या नवनवीन कल्पक व दर्जेदार वस्तूंची प्रसिद्धी व नागरिकांना खरेदी करता येण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध सणांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कारागृह उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावे आयोजित करण्यात येत असतात.  (Pune News )कारागृह उत्पादित वस्तूंची मोठ्या व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

हे प्रदर्शन व विक्री 26 जानेवारी पर्यंत उद्योग विक्री केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह ,येरवडा पुणे येथे सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.