Pune News : शरद पवारांवर टीका करणाऱ्या तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करा – गिरीश गुरनानी

एमपीसी न्यूज – भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. याप्रकरणी राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना निवेदन दिले आहे.

क्रुझ पार्टीवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

‘व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है,’ असं म्हणत तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेवरुन राष्ट्रवादीने कारवाईची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.