Wakad Crime News : पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मालक, मॅनेजरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका हॉटेलवर कारवाई केली. हॉटेल मालक आणि मॅनेजर विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) पहाटे चार वाजता द मॅजेस्टिक हॉटेल, जगताप डेअरी येथे करण्यात आली.

हॉटेल मालक संदीप प्रताप थोरवेरा (रा. जगताप डेअरी, पुणे), हॉटेल मॅनेजर अनुराग सुभाष भिलारे (रा. शुक्रवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार आर एन भोसले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप थोरवेरा याचे जगताप डेअरी येथे द मॅजेस्टिक हॉटेल आहे. त्या हॉटेलवर आरोपी अनुराग भिलारे हा मॅनेजर म्हणून काम करतो. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी ब्रेक द चेन अंतर्गत 20 ऑक्टोबर रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व रेस्टोरंट, बार, फूड कोर्ट हे रात्री बारा पर्यंत सुरु राहतील, असे सांगण्यात आले आहेत.

असे असतानाही आरोपीने त्याचे हॉटेल पहाटे चार वाजेपर्यंत सुरु ठेवले. आरोपींनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाने उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.