Pune News : ‘बनारसी साडी’ संकल्पनेवर आधरित भव्य ‘शुभ शृंगार केक’ने वेधले जागतिक स्तरावरील नागरिकांचे लक्ष

एमपीसी न्यूज : उच्च दर्जाचे रेशीम (Pune News) आणि भरगच्च जरीकाम..आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी बनारसी साडी ही जगभरात प्रसिद्ध आहे. बनारसी साडी आणि तिला शोभेल असा साजशृंगार…भारतीय संस्कृतीचा हा पैलू भव्य अशा ‘शुभ शृंगार केक’च्या माध्यमातून साकारण्याची किमया पुण्यातील एका कलाकाराने साधली आहे. या अनोख्या कलाकृतीला जगभरातून दाद मिळत आहे.

पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबाल देब यांनी नुकतेच ‘बनारसी साज’ संकल्पनेवर आधारित भव्य असा रॉयल आयसिंग केक तयार केला आहे.

इटली येथील इंटरनॅशनल केक प्रोजेक्ट’साठी हा भव्य केक तयार करण्यात आला आहे. या प्रॉजेक्टसाठी जगभरातून केक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कलाकारांना केक’च्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती सादर करण्यास सांगितले होते. या प्रोजेक्टसाठी पुण्यातून प्राची यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी केक’च्या माध्यमातून पारंपरिक भारतीय वेशभूषेतील लोकप्रिय प्रकार असलेली बनारसी साडी आणि पारंपारिक दागिने सादर करण्यात आले आहे.

आपल्या या कलाकृतीबाबत प्राची म्हणाल्या, “मला भारतीय वारसा आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर (Pune News) सादर करायची होती. मात्र त्याच वेळी, एक अशी कलाकृती तयार करायची होती जी माझ्या मनाच्या अगदी जवळ असेल. यासाठी मला खास बनारसी साडीचा पर्याय योग्य वाटला, जी मला माझ्या आईकडून मिळाली होती. त्यामुळेच तिच्याशी वारसा आणि आपलेपणा हे दोन्ही घटक जोडलेले आहेत. मी तयार केलेला 32 इंच भव्य बनारसी साडी-आधारित केक म्हणजे आकर्षक रंग, आकृतिबंध, फुलांची वैशिष्ट्ये, साडीवरील चांदी व सोनेरी जरीचे काम आणि अगदी बारीक तपशील लक्षात घेऊन बनविलेले पारंपारिक दागिने यांचे मिश्रण आहे. या ‘केक’ची रचना सिंदूर-दाणी प्रमाणे करण्यात आली आहे. हा केक हाताने विणलेल्या साडीप्रमाणे दिसावा, यासाठी हजारो स्वतंत्र ठिपके वापरून फुलांचे घटक केले गेले आहेत. त्यांना खाण्यायोग्य सोनेरी रंगाने रंगवण्यात आले आहे.”

Pune News : आईच्या निधनाचे दुःख विसरण्यासाठी लहानथोरांसह तापकीर कुटुंबियांची वृद्धाश्रमात सेवा…

हा ‘बनारसी साडी केक’ सध्या प्राचीच्या पुण्यातील केक स्टुडिओमध्ये आहे. या केक स्टुडिओमध्ये प्रवेश करतच तुम्ही रोआल्ड डहलच्या ‘चार्ली अँड चॉकलेट फॅक्टरी’च्या भव्य रचनेत प्रवेश केल्याप्रमाणे कल्पनारम्य जगात पोहोचता. चार्ली हे पात्र ज्याप्रमाणे कारखान्यात फिरतो आणि चॉकलेटचे फट पाहत मंत्रमुग्ध होतो, त्याचप्रमाणे प्राचीने साकारलेल्या ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रकारातील आणि अतिशय आकर्षक कलाकृती पाहून आपण थक्क होतो.

मध्य प्रदेशातील रीवा येथे जन्मलेल्या प्राची यांनी आपले शालेय शिक्षण उत्तराखंड येथील डेहराडून येथे पूर्ण केले. त्यांनी कोलकाता येथून महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण घेतले. त्यांचे पती हे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून आयटी क्षेत्रातील कर्मचारी आहेत. प्राची या सध्या त्या पिंपरी चिंचवड येथील रहाटणी परिसरात राहतात.

प्राची यांनी रॉयल आयसिंग या किचकट कलेचे शिक्षण युनायटेड किंगडममध्ये जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. सामान्यतः पारंपारिक पाककलेत रॉयल आयसिंग’साठी अंडयाचा वापर केला जातो. परंतु भारतीय बाजारपेठ लक्षात घेत, प्राचीने अंड्याचा वापर न करता, पूर्णत: शाकाहारी उत्पादन ‘व्हेगन रॉयल आयसिंग’ विकसित केले. भारतीय कंपनी सुगारिनच्या सहकार्याने हे स्मारक साकारण्यात आले असून, प्राची यांचे हे उत्पादन भारतात तसेच जगभरात उपलब्ध आहे.

प्राची यांनी व्हेगन रॉयल आयसिंग केक या प्रकारात अनेक उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारल्या आहेत. त्यांच्या कलात्मकतेसाठी त्यांना ‘क्वीन ऑफ रॉयल आयसिंग’ असे संबोधले जाते.

पुरस्कार आणि मान्यता-

– जानेवारी 2022 मध्ये सर्वाधिक अंडी-मुक्त, शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्‍चर्ससाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनद्वारे सन्मानित
– जानेवारी 2022 वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये जास्तीत जास्त वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्ससाठी दुसरा जागतिक विक्रम.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.