Pune News : त्या कांड्या जिलेटीनच्या नसल्याचा अंदाज; पोलिसांकडून तपास सुरू

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याचा दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांची एकच धावाधाव उडाली होती. मात्र प्राथमिक तपासाअंती त्या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे आणि त्याला कोणताही विद्युत करंट नसल्याचे आढळून आले आहे. मात्र पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने ते सुरक्षितपणे बी.जे.वैद्यकीय महाविद्यालायाच्या मैदानावर नेले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक रघुवंशी यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांना कळविले की, पुणे रेल्वे स्टेशन येथील जनरल रिझर्वेशन काउंटर समोरील मोकऴ्या जागेत जुन्या आगमन प्रवेशव्दाराजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे कऴविले.त्यांनी लगेचच लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला कऴविले.

 

बॉम्ब सदृश्य वस्तूची माहिती मिऴताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, रेल्वे सुरक्षा दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पुणे व पुणे शहर,फायर बिग्रेड तसेच सर्व संबंधितांना कळविले.तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक व श्वान पथकाकडून तपासणी केल्यानंतर त्या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे व त्यांना कोणताही विद्युत प्रवाह जोडला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

या पथकाने बॉम्ब सदृश्य वस्तू बी.जे. वैद्यकीय महाविद्यालायाच्या मैदानावर नेली असून अंतिम तपासणीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्यात ये आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत आणि वित्तीय हानी झालेली नाही.रेल्वे प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.