Pune News : 8 हजार 370 कोटींचे बजेट कसे पूर्ण होणार; सुभाष जगताप यांचा सवाल

एमपीसी न्यूज – मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात 2800 कोटी रुपये तूट आहे. त्यामुळे 8 हजार 370 कोटी रुपये कसे जमा होणार, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला.

सुभाष जगताप म्हणाले, तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल रासने यांचे धन्यवाद, त्यांच्याकडे जादूची कांडी असल्याची चर्चा आहे. 1 सुद्धा लायकीचा सदस्य नाही. 8 हजार 370 कोटी बजेट सदर करून भ्रमनिरास झाला. आत्मनिर्भर, अच्छे दिन, अशा योजना आता नकोशा झाल्यात. 1 ही झोपडी पुनर्वसन केली नाही. मनमोहन सिंग सरकारच्या योजना बंद पाडल्या. 4 वर्षे झाले तुमच्या कामांची चौकशी का केला नाही? कोणता महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावला. 2 हजार कोटी कर्ज घेतले, 8 ते 10 हजार कोटींची प्रकल्प सुरू आहेत. माझी 4 वर्षं भाषणे होत असतानाच भाजप नगरसेवक गोंधळ घालायचे. मी जेवढी रक्कम सांगितले तेवढेच रक्कम जमा झाले. टॅक्समध्ये मोठा दिलासा दिला.

4 हजार 500 कोटी खर्च होतोय. 2017 ते आतापर्यंत 3 हजार कोटींची तूट आहे. आमच्या हातात मनपा असताना कोणतेही कर्ज नव्हते. पार्किंग पॉलिसी 3 वर्षे होऊन गेले त्याची अंमलबजावणी झाली नाही. ही योजना मार्गी लागली असती तर 9 हजार कोटी रुपये मिळाले असते. कर्ज काढण्याची वेळच आली नसती. 8 हजार 370 कोटी कसे जमा करणार, मागील वर्षीच 2800 कोटी रुपये तूट आहे. गरज सरो, वैद्य मरो, अशी वागणूक पुणेकरांना दिली. मला केवळ 1 कोटी 20 लाख दिले. तर भाजप नगरसेवकांना 5 ते 6 कोटी रुपये मिळाल्याने आंनद व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.