Pune News: घरमालकिणीने चप्पल चोरल्याचा आळ घेतल्याने घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या

एमपीसी न्यूज: घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मालकिणीने चप्पल आणि पर्स चोरल्याचा आरोप केल्याने दुखावलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहम्मदवाडी येथील कृष्णानगरमध्ये हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी घरमालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पायल बाबू चव्हाण (वय 17) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवी रितेश अग्रवाल (वय 40) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी काम करत होती. पल्लवी यांनी पायल हिच्यावर पर्स आणि चप्पल चोरीचा आळ घेतला होता. तसेच तिला वारंवार त्रास देखील दिला होता. चोरीचा आळ आणि होणारा त्रास सहन न झाल्याने पायलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.