Koregaon News: शौर्य दिनी 10 लाख भिम अनुयायी यांचे अभिवादन

शासकीय आयोजन व स्मारकाचे घोषणेमुळे कमालीचे उस्ताही वातावरण

एमपीसी न्यूज: भिमा कोरेगाव लढयातील शुरवीर महार योध्यांच्या गौरवारार्थ आयोजित 204 व्या शौर्य दिनी आज विजय स्तंभ पेरणे या ठिकाणी तब्बल 10 लाख भिम अनुयायानी अभिवादन केलेले आहे. या वर्षीचा संपूर्ण उत्सव राज्य सरकाराच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यातआला होता. त्यामुळे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधा व योग्य नियोजन यामुळे तसेच राज्य सरकाराने केलेल्या भिमा कोरेगाव शौर्य स्मारकाच्या १०० कोटी रूपयांच्या घोषणेमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये कमालीचा उत्साह पाहावयास मिळाला आहे. आजच्या शौर्यदिनी अभिवादानासाठी आलेल्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणेचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांचे अध्यक्षतेखालील सदस्य सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजबिये, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय समितीने आहोरात्र मेहनत करून या उत्सवाचे नियोजन केले आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी केलेल्या योजनामुळे आतापर्यंतचे सर्वोत्तम नियोजन ठरले आहे. या नियोजनाचे कौतुक सर्वच अबाल -वृध्द भिम अनुयायांनी केलेली असून, पुढील वर्षी देखील शासनानेच नियोजन करावे अशा अपेक्षा व्यक्त केली.

भारतीय स्वतंत्राच्या अमृतवर्षाच्या निमित्ताने विजय स्तंभाची सजावट भारतीय राष्ट्रीय ध्वजाची प्रतिकृती साधणाऱ्या अशोक चक्रांकीत तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच दि. 31/12/2021 करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिष बाजीमुळे वातावरण प्रसन्न व आनंदायी वाटत होते. आज शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी विजयस्तंभ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे, ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोड, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, भिम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे आमदार योगेंद्र कवाडे, रिपब्लीकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय दलित कोब्राचे अॅड. भाई विवके चव्हाण, रिपब्लीकन युवा मोर्चाचे सुवर्णा डंबाळे, विजय स्तंभ समितीचे सर्जेराव वाघमारे आदी मान्यवार उपस्थित होते.

शासनाने नियोजन करावे याबाबतचा आग्रह ज्या उद्देशाने रण्यात आला होता. तो उद्देश शासनाच्या योग्य नियोजनामुळे सफल झाला असून, घोषीत केल्याप्रमाणे भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य भूमी येथे तात्काळ 100 कोटी रूपयांचे आंतरराष्ट्रीय युध्द स्मारक उभारण्यात यावे,’ अशी आंबेडकरी जनतेची ईच्छा असल्याची भावना शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.