Pune News : सीरम इन्स्टिट्यूटला ‘कोविशिल्ड’च्या क्लिनिकल चाचण्या पुन्हा सुरू करण्याची परवानगी

डीसीजीआयने दुस-या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी नवीन उमेदवाराची निवड करण्यास मनाई केलेला पूर्वीचा आदेश देखील फेटाळला आहे.

0

एमपीसी न्यूज – भारतीय औषध नियंत्रक जनरल (डीसीजीआय) डॉ. व्हीजी सोमाणी यांनी काल, मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी कोविड -19 वरील लस ‘कोविशिल्ड’च्या क्लिनिकल चाचण्या पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. यासह डीसीजीआयने दुस-या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी नवीन उमेदवाराची निवड करण्यास मनाई केलेला पूर्वीचा आदेश देखील फेटाळला आहे.

‘डीसीजीआय’ने 11 सप्टेंबर रोजी ‘कोविशिल्ड’ लसीच्या चाचण्या थांबवल्या होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव या चाचण्या पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आल्या होत्या.

या लसीचे सुरूवातीचे परिणाम चांगले दिसून आले होते. मात्र, लस दिलेल्या एका समन्वयकास त्रास सुरू झाल्यानंतर अमेरिका व ब्रिटनमध्ये या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या.

‘डीसीजीआय’ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला नोटीस पाठवून चाचणी थांबविण्यास सांगितले होते.

भारतातील 17 ठिकाणी ऑक्सफोर्ड लसीच्या ट्रायल घेण्यात येत आहेत. दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील यशस्वी चाचणीनंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगभरात लसीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.