Pune News : पीएमपीएमएलच्या ठेकेदारांचा संप मागे, शंभर टक्के बसेस पुन्हा मार्गावर

एमपीसी न्यूज – पीएमएलच्या चार कंत्राटदारांना थकीत 99 कोटी (Pune News) बिलापैकी 66 कोटी रुपये दिल्याने अखेर आज (मंगळवार) पासून संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून पुर्ण 1 हजार 421 बसेस पुन्हा मार्गावर धावणार आहेत.

मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे ईव्ही ट्रान्स प्रा. लि. व मे. ओहा कम्युट प्रा. लि व हंसा या 4 ठेकेदारांनी त्यांचे चार महिन्यांचे 99 कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी (दि.5) अचानक संप पुकारला होता. त्यातील 66 कोटी रुपये मिळाल्याने कंत्राटदारांच्या 907 बसेस पुन्हा संचलनात आणल्या आहेत. यावेळी पुढील थकीत बील ही लवकरच देण्यात येईल असे आश्वासन कंत्राटदारांना देण्यात आले आहे.

Pune Crime News : काळूबाई मंदिरातून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस

हा संप मिटविण्यासाठी सोमवारी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने 90 कोटी रुपये पीएमपी प्रशासनाला दिले. यात पुणे महापालिकेने 54 कोटी तर पिंपरी चीचवड महापालिकेने 36 कोटी रुपये दिले.त्यापैकी कंत्राटदारांचे 66 कोटी रुपये देण्यात आले.तर 24 कोटी रुपये हे’ एमएनजीएल’ चे देण्यात येणार आहे. कंत्राटदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. पैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल सोमवारी देण्यात आले.

यावेळी पीएमपीएमएलचे व्यस्थापकीय संचालक अध्यक्ष ओमप्रगकाश बकोरिया (Pune News) यांनी मंगळवार पासून सर्व सेवा पूर्ववत संचलनात असणार आहे ,अशी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.