Pune News : पुणेकरांना मिळकतकर भरण्याच्या सवलतीला मिळणार मुदत वाढ!

एमपीसी न्यूज – मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये सवलतीत कर भरण्यासाठी असलेली 31 मेची मुदत 30 जूनपर्यंत महापालिकेने वाढवली होती. यंदाही ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ही मुदतवाढ द्यायची झाल्यास स्थायी समितीच्या आगामी बैठकीत तो मान्यतेसाठी ठेवला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी कोरोना काळात पुणेकरांनी विक्रमी मिळकत कर भरला होता. यंदा देखील शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊनमध्ये पुणेकरांनी मिळकतकर भरण्यात आघाडी घेतली आहे. दि. 1 एप्रिल ते 22 मेअखेर पर्यंत तब्बल 449 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

मागील वर्षी याच कालावधीत 196 कोटी रुपये जमा झाले होते. विशेष म्हणजे मिळकतर विभागाचे बहुतांश कर्मचारी कोरोना ड्युटीवर असतानाही करसंकलन विभागाने गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक कर वसूल केला आहे.

दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे कालावधीत मिळकतकर भरणाऱ्या पुणेकरांना सर्वसाधारण करात 10 ते 15 टक्के सवलत देण्यात येते. मात्र, करोना संकटातही प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना महापालिकेने अनोखी भेट दिली. यात मागील सप्टेंबरपूर्वी कर भरणाऱ्या निवासी मिळकतींना राज्यशासनाचे कर वगळून सरसकट 15 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी यंदा गतवर्षीच्या तुलनेत पालिकेच्या तिजोरीत दुप्पट कराची बेगमी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.