Pune News : रवींद्र धंगेकर लोणार समाजातील दुसरे आमदार निवडून आले – अजित पवार

एमपीसी न्यूज : रवींद्र धंगेकर हा लोकांच्या मनातील उमेदवार (Pune News) होता. तो हरहुन्नरी, लोकांना भेटणारा, पोहोचणारा आणि सर्वांशी चांगले संबध असणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत अनेक पक्षातील व्यक्तीनी त्याच काम केले आहे. तसेच आजपर्यंतच्या 75 वर्षाच्या इतिहासात विधिमंडळात लोणार समाजाच प्रतिनिधित्व करणारे दुसरे आमदार रवींद्र धंगेकर हे ठरले आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रवींद्र धंगेकर यांच्या कार्याच कौतुक केले.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक 2023 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदारांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Talegaon Dabhade : आमदार शेळके यांनी मांडला विकासकामांच्या निधीचा लेखाजोखा

यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सर्व्हे केला होता. त्यावेळी दोन्ही जागेवरील सर्व्हे पॉझिटिव्ह आले होते. पण, उमेदवार योग्य द्या असे सांगण्यात आले होते. चिंचवड निवडणुकीत राहुल आणि नानामध्ये एक वाक्यता करण्यात कमी पडलो. त्यामुळे त्या दोघांची मत निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा दहा हजारांनी जास्त होती. ही बाब मतमोजणीवेळी सर्वांच्या लक्षात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील सरकारने एवढी ताकद लावली (Pune News) की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाण मांडून होते. अनेक बैठका, रोड शो घेतले. तसेच त्यावेळी दोन्ही मतदारसंघात बाहेरची यंत्रणा लावल्याचे पाहण्यास मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी पुण्यात सभा होणार – अजित पवार 
चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील महा विकास आघाडीच्या उमेदवारना मिळालेली मत लक्षात घेता.यापुढील काळात देखील याही पेक्षा चांगल काम कराव लागणार असून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभा विभागीय घेतल्या जाणार आहेत.ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा 14 मे रोजी पुण्यात होणार असल्याच अजित पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.