Moshi : शेतात गांजाचे झाड लावल्याप्रकरणी मोशीत एकाला अटक

एमपीसी न्यूज – बोऱ्हाडेवाडी मोशी येथे सचिन ओझरकर (Moshi) यांच्या शेतात गांजाचे झाड आढळले. त्या झाडाचे वजन तब्बल तीन किलो असून ते झाड अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 11) सकाळी पावणे बाराच्या सुमारास करण्यात आली.

हस्तीमल रत्नाराम लोहार (वय 30, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी मूळ रा. नौसराबावडी, ता. आहौर, जि. जाल्लोर, राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आनंद बनसोडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade : आमदार शेळके यांनी मांडला विकासकामांच्या निधीचा लेखाजोखा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोहार याने सचिन ओझरकर यांच्या शेतात आडोशाला गांजाचे झाड लावले. शनिवारी सकाळी या गांजाच्या झाडाबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला (Moshi) माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 283 सेंटीमीटर उंचीचे झाड जप्त केले.

या झाडाचे वजन 3.139 किलो असून याची किंमत 78 हजार 475 रुपये इतकी आहे. गांजा विक्रीसाठी हे झाड लावले असल्याचे तपासात समोर आले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.