Pune News: दिग्दर्शक संजय जाधव यांना रूपाली चाकणकरांनी पाठवली नोटीस, ‘त्या’ होर्डिंगबद्दल मागितला खुलासा

एमपीसी न्यूज: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक संजय जाधव यांना एक नोटीस पाठवली आहे. संजय जाधव यांच्या आगामी अनुराधा या वेब मालिकेच्या प्रचारात लावण्यात आलेल्या फलका बाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. एका महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणे प्रदर्शन करत असल्याचे हे होर्डिंग्स सध्या समाज माध्यमावर फिरत आहेत. याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, अनुराधा या वेबसीरिजच्या प्रचारार्थ अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचे पोस्टर पुणे शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. या पोस्ट मुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंग प्रदर्शन असा चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. त्यामुळे या पोस्टर मागची भूमिका आणि उद्देश स्पष्ट करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

ऍड. जयश्री पालवे नामक महिलेने या विषयाचे पोस्टर ट्विटर वर टाकत राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी असे म्हटले होते. धूम्रपान बंदी असताना या मध्ये एका महिलेने अंगप्रदर्शन करीत हातात पेटती सिगारेट घेतली आहे महिलेचे असे अंगप्रदर्शन करणे योग्य आहे का राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी असे म्हटले होते. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत दिग्दर्शक संजय जाधव यांना ही नोटीस पाठवत ई-मेल वर याबाबतचा खुलासा करण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.