Pune News : डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहात डायलेसिसचे उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहात दहा खाटांचे डायलेसिस उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक डायलेसिस मशिन, बेड, मॉनिटर आदीची खरेदी आणि प्रकल्प चालविण्यासाठी सुमारे १४ लाख ६५ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.