Pune News : म्हाडा व टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी बुलढाणा व नाशिक येथून दोन एजंट ताब्यात

एमपीसी न्यूज – म्हाडा व टीईटी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी बुलढाणा व नाशिक येथून दोन एजंटना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि.19) पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली.

दीपक विक्रम भुसारी (वय 32, रा. अयोध्या नगर, बुलढाणा)  असे म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर,  राजेंद्र विनायक सोळुके (वय 52, रा. बोराळे, ता. नांदगाव, नाशिक) असे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेत गैरव्यव्हार प्रकरणी अटक आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने भुसारी याला 24 व सोळुके 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा पेपर फुटी प्रकरणी हरहळ बंधू अटकेत आहेत. तपासात आरोपीने बुलढाणा येथील एजंटचा सहभाग असल्याची माहिती दिली. सायबर पोलिसांनी शनिवारी बुलढाणा येथे जाऊन एजंट दीपक भुसारी याला ताब्यात घेऊन चौकशी त्यांने म्हाडा परीक्षेत परिक्षार्थी यांची माहिती दिल्याचे कबूल केले.

 तसेच, टीईटी परिक्षेतील गैरव्यव्हार प्रकरणी आरोपी स्वप्निल पाटील याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अधिकची चौकशी केल्यावर त्यांने नाशिक येथील एजंट राजेंद्र सोळुके याची माहिती दिली. पोलिसांनी सोळुके याला शनिवारी नाशिक येथून ताब्यात घेतले. सोळुके याने आरोपी पाटील याला काही परिक्षार्थी यांची नावे पात्र करण्यासाठी पाठविली असल्याचे तपासात निष्पण्ण झाले. पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.