Pune : नीलिमा गायकवाड आणि संतोष सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज- पुण्यात कालवा दुर्घटनेच्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात अडकलेल्या लहान मुलांची आणि नागरिकांची सुटका करणारे पोलीस कर्मचारी नीलिमा गायकवाड आणि संतोष सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे पोलीस आयुक्त के वेंकेटेशम, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडके, पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, शेषराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.