Pune : महापालिकेला ‘नाे पार्कींग’च्या दंडातून दीड काेटीचे उत्पन्न!; वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

एमपीसी न्यूज – नाे पार्कींगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. दंड आकारण्यासाठी महापािलकेच्या पावती पुस्तकाचा वापर करतात. यातील एकूण जमा हाेणारी दंडाची रक्कम पन्नास टक्के रक्कम महापािलकेकडे जमा केली जाते. यातून महापािलकेला सुमारे दीड काेटी रुपये उत्पन्न मिळात आहे.

महापािलका अधिनियमानुसार महापािलकेला नाे पार्कींग क्षेत्रात वाहन उभे करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचा अधिकार आहे. या नियमानुसार महापािलका २०१०-२०११ सालापासून दंड वसूल करीत आहे. परंतु गेल्यावर्षीपासून वाहतूक पोलिसांनी महापािलका अधिनियमानुसार कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • या नियमानुसार नाे पार्कींगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकीसाठी एक हजार रुपये आणि चार चाकीवाहनासाठी दाेन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. माेटार वाहन कायद्यानुसार नाे पार्कींगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांकडून केवळ दाेनशे रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. नियम ताेडणाऱ्यांना धाक बसावा, म्हणून महापािलका अधिनियमानुसार कारवाई केली जात आहे.

गेल्या वर्षीपासून या दंडाची रक्कम माेठ्या प्रमाणावर वसूल हाेत आहे. २०१० ते जुलै २०१९पर्यंत महापािलकेला या दंडापैकी सुमारे १ काेटी ४५ लाख रुपये इतका वाटा वाहतूक पोलिसांकडून मिळाला आहे.

  • महापािलका आणि पोलीस यांचा वाटा लक्षात घेता सुमारे तीन काेटी रुपये दंड आतापर्यंत वसूल केला गेला आहे. गेल्यावर्षी सुमारे ३५ लाख ७२ हजार २५१ रुपये इतका वाटा मिळाला हाेता. यंदा मे अखेरपर्यंत १८ लाख ९७ हजार ६२८ रुपये इतका दंडाचा वाटा महापािलकेला मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.