Pune : पुण्यातील या भागात 8 ते 22 जानेवारी कालावधीत होणार एक वेळ पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – पर्वती येथील एमएलआर टाकी वरून (Pune)ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या 1 हजार 473 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी 8 जानेवारी ते 22 जानेवारी कालावधीत भवानी पेठ स्वारगेट परिसर शंकर शेठ रस्ता या परिसरात दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे.

एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणारा भाग पुढील प्रमाणे

स्वारगेट पोलीस वसाहत, झगडेवाडी, खडकमाळ आळी, (Pune)संपूर्ण घोरपडी पेठ,मोमिनपुरा, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत, लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रस्ता, संपूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भाग.

Chinchwad : ‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता – देवेंद्र फडणवीस

भगवान दास चाळ, वायमेकर चाळ, राजेवाडी, पत्राचाळ एसआरए, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी, मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र

विद्यापीठ, सीपीएडबल्यू क्वार्टर, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रस्ता एसटी बस स्थानक ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी, लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी.

या भागासाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था 800 मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.