Pune : क्रेनच्या साहाय्याने उचललेली लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू; मेट्रोच्या कामातील पहिला अपघात

एमपीसी न्यूज – पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनच्या साहाय्याने उचललेली लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 24) पहाटे घडली.

उमेश बेसाहू श्याम वय 23 रा. नागपूर चाळ, मूळ मध्यप्रदेश )असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव असून या प्रकरणी क्रेन चालक जितेंद्र उमा प्रजापती (वय 30) याच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावर मोबोज चौकात मेट्रोचे काम सुरू आहे. दिवसा गर्दी असल्यामुळे रात्रपाळीमध्ये काम करावे लागते. मंगळवारी पहाटे क्रेनच्या साहाय्याने प्लेट उचलण्याचे काम सुरू होते. त्यावेळी उचललेली प्लेट घसरून खाली पडली. त्याखाली सापडून उमेश बेसाहू श्याम हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

पुण्यात मेट्रोचं काम सुरू झाल्यानंतरची पहिलीच घटना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.