Pune : ‘पीएमपीएमएल’च्या नवीन 50 बसेस जागेवरच पडून; आमदार चेतन तुपे यांची घटनास्थळी भेट

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. नवीन 200 बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातील 50 बसेस जागेवर पाडून असल्याचे चित्र दिसून आले. त्याची नवनियुक्त आमदार चेतन तुपे यांनी गंभीर दखल घेतली.

200 नवीन मीडी बसेस विकत घेण्यात आल्या होत्या. त्यातील काही बस शेवाळवाडी येथील डेपोमध्ये उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. नवीन असलेल्या बस अजून वारंटीमध्ये आहेत. परंतु, या बंद पडतात म्हणून वारंटीमध्ये रिपेअर न करता वॉरंटी संपण्याची वाट पाहत या ठिकाणी उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अगोदरच बसेस कमी आहेत. जुन्या बस रस्त्यावरती आणि नवीन बसेस उभ्या, असा अजब कारभार पुण्यामध्ये चालू आहे. काही लोकांनी तक्रार केल्यानंतर आमदार तुपे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. लोकांच्या तक्रारीत तुपे यांना तथ्य आढळले.

पुणेकरांची गैरसोय करण्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, याचा छडा लावला गेला पाहिजे. वेळप्रसंगी हा प्रश्न विधानसभेत सुद्धा मांडू. असा गैरकारभार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. पुणेकरांचे हीत प्रथम पाहिले जाईल, असे चेतन तुपे यांनी सांगितले.

या बसेस गेल्या दोन महिन्यांपासून उभ्या आहेत. पूर्वी त्या पिंपरीला ठेवल्या होत्या. आता तिथून त्या शेवाळवाडीच्या डेपोमध्ये आणून ठेवलेल्या आहेत. त्यांचं कोणतही रीपेरिंग किंवा इतर कसलही काम चालू नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.